फलटण चौफेर दि २९ ऑगस्ट २०२५ शेतकरी आणि व्यापाऱ्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी विधानसभेचे माजी सभापती आ श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज जिल्हाधिकारी सातारा यांच्या कार्यालयात आक्रमक भूमिकाघेतली.अहमदनगर–फलटण–सांगली या राष्ट्रीय महामार्ग क्र. १६० च्या रुंदीकरणामुळे शेतजमिनींचे नुकसान, व्यापारावर परिणाम तसेच सामाजिक-आर्थिक अडचणी निर्माण होणार असल्याची बाब त्यांनी ठळकपणे मांडली.या बैठकीत संबंधित विभागाचे अधिकारी, कोळकी, झिरपवाडी, भाडळी, दुधेबाव परिसरातील शेतकरी तसेच फलटण शहरातील व परिसरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रश्नाबाबत मागील काळात शेतकरी व व्यापाऱ्यांनी श्रीमंत रामराजे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही समस्या मांडली होती त्यावर शेतकरी व व्यापाऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर रामराजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत बाधितांवर अन्याय होणार नाही, यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली.
रामराजे यांनी सांगितले की, “स्थानिक नागरिकांच्या अडचणी गांभीर्याने सोडवाव्यात, अन्यथा बाधितांचा प्रश्न मी थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत घेऊन जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले